पुण्याच्या शिवाजी मार्केटला भीषण आग,२५ दुकाने जळून खाक

0
21

पुणे: पुण्याच्या शिवाजी मार्केटला आज सकाळी साडे चार च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत या मार्केट मधील पंचवीस दुकाने जळून खाक झाली आहे. त्यानंतर लागरच अग्निशमन दलाच्या जवानांना संपर्क करण्यात आला.त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण मार्केटला भीषण आग लागली.तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीत.मात्र दुकानात असणाऱ्या कोंबड्या आणि बकऱ्यांचा मात्र आगीत जळून मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजून समजू शकलेले नाही.