जळगावात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! ,दोन दिवसात घडल्या ३ अत्याचाराच्या घटना

0
19

जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत.गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तीन महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या. रावेर येथील अत्याचाराती घटना ताजी असतानाच भुसावळ मध्ये 35 वर्षीय महिलेवर तर मुक्ताईनगर तालुक्यात 22 फेब्रुवारी रोजी एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पोलिसांनी मुक्ताईनगर घटनेतील आरोपी चेतन रवींद्र सुतार यास अटक केली आहे. त्याचबरोबर पीडित मुलीची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.तसेच रावेर शहरात चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली होती. तीन ते चार अज्ञातांमी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर त्यांनी मुलीसह चारही जणांची हत्या केली होती.

Leave a Reply