दुसऱ्या डावात आर. अश्विनची बॅट तळपली, शतकी खेळीने भारताचा डाव सावरला

0
170
SOURCE- BCCI TWITTER
SOURCE- BCCI TWITTER

आर. अश्विनने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. 133 चेंडुचा सामना करत आर. अश्विनने शतकी खेळी केली. आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतले हे पाचवे कसोटी शतक आहे. त्याच्या शानदार खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंड 3 गडी गमवूर 53 धावा केल्या आहेत. आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचा आहे.