लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर बरसले

0
158

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. केंद्र सरकार हम दो हमारे दो या प्रकारचे असल्याची बोचरी टीका केली. दोन जण सरकारमध्ये आहेत तर त्यांचे दोन मित्र उद्योगपती आहेत. कृषी कायदे आणि त्यामागची कारणं यावर चर्चा झाली पाहीजे असंही त्यांनी सांगितले. उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठीच हे कायदे आणल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान भाजपा खासदारांनी गोंधळ घातला. भाजपा खासदारांनी आज बजेटवर चर्चा असल्याचे सांगत शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यावर न बोलण्याचं आवाहन केले. तेव्हा राहुल गांधींनी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडत बजेटवर येत असल्याची प्रतिक्रिया दिली.