नुकतंच काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे
या पत्राद्वारे पक्षात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे
यानंतर सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या
आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधीना पुन्हा नेतृत्व करण्याची मागणी केली आहे
बाळासाहेब थोरात यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व स्विकारण्याची मागणी केली आहे
राहुलजी तुम्ही परत या, केवळ काँग्रेस नव्हे तर संपूर्ण देशाला तुमची गरज आहे असे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलंय