राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस

0
25

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. 18 ते 21 मार्चदरम्यान राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता त्याचा धक्का मराठवाड्याच्या काही भागात बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, कारण या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटला सुरुवात झाली आहे. तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात देखील  पावसासह गारपीट झाली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. त्यामुळे या भागातील पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय.