पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये तसेच कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
यामुळे हवामानात बदल होणार असल्याने संसर्गजन्य आजार वाढण्याची देखील शक्यता आहे. तसेच गहू उत्पादक शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे.
त्यामुळे आज दिवसभरात शेतकऱ्यांना आणि इतरांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.