राज ठाकरेंचा महिलादिनानिमित्त संदेश

0
45

जगभरात आजचा हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच अनेक माध्यमातून स्त्रीशक्तीच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करताना मोलाचा सल्ला आपल्या भगिनींना दिला आहे.  

”आज जागतिक महिला दिन. महिला दिन हा मूळात वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला कळत  नाही. आमचे आजोबा म्हणायचे, ‘बांधवांनो, महिलांबद्दल जितका आदर तुम्ही आपल्या मनात साठवाल  वाढवत जाल, तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील.’ त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो. मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही कोणत्याही स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही. राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही. तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता. बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा”, असे म्हणत राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.