भारताची 43,000 स्क्वे. किमी जागा चीनच्या ताब्यात !

0
40

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीन वादावर राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. पँगाँग लेकबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला असून दोन्ही देशाचे सैनिक मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिल 2020 पूर्वीसारखी स्थिती तिथे पुन्हा एकदा लागू होणार आहे. भारताची एक इंचही जागा कुणाला घेऊ देणार नाही असेही त्यांनी पुढे सांगितले.

चीनने 1962 मध्ये केंद्रशासित लडाखमधील 38,000 स्क्वे. किमी जागा बळकावली असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर 1963 पाकिस्तानसोबत झालेल्या तत्कालीन सीमा करांतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 5,180 स्क्वे. किमी जागाही चीनच्या ताब्यात असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.