राज्यपाल कोश्यारींना सरकारी विमानातून का उतरवलं?; राज्यपाल विरुद्ध मविआ सरकार वाद शिगेला

0
428
SOURCE-BHAGAT SINGH KOSHYARI TWITTER
SOURCE-BHAGAT SINGH KOSHYARI TWITTER

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सरकारी विमानातून खाली उतरवल्याने राजकारणाला ऊत आला आहे. राज्यपाल कोश्यारी खासगी दौऱ्यासाठी उत्तराखंड येथे जाणार होते. मात्र त्यांना सरकारी विमान या दौऱ्यासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांना खासगी विमानातून उत्तराखंडला जावे लागले.

ठाकरे सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीनं त्यांना प्रत्युत्तर दिले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राज्यपालांवर निशाणा साधला होता. सरकारने नियमानुसार 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार केली. ती यादी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. मात्र अजूनही राज्यपालांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही.सत्तास्थापनेच्या पहिल्या दिवसापासून राज्यपाल विरूद्ध महाविकास आघाडी असा वाद यापूर्वीही महाराष्ट्रानं पाहिलाय. आमदारांची नियुक्ती ते सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण राज्यपाल आणि महाविकास आघाडीत कायमच वाद राहिलाय. त्यामुळे येत्या दिवसात हा वाद आणखी शिगेला जाण्याची शक्यता आहे.