राखी सावंतच्या आईला ‘या’ महाभयंकर आजाराने ग्रासले, शेअर केली भावुक पोस्ट

0
44

रिऍलिटी शो ‘बिग बॉस १४’ ची स्पर्धक राहून गेलेल्या राखी सावंतने शेअर केली एक भावूक पोस्ट. या पोस्टमध्ये राखी सावंतने आपल्या खासगी आयुष्यातील महत्वाची गोष्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आईसाठी प्रार्थना करायला सांगितले आहे. सध्या राखीची आई गंभीर आजाराला सामोर जात आहे. राखी सावंत आपल्या आईच्या खूप जवळ आहे.राखी सावंतने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिथे तिने आपल्या आईला कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे.

राखीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये राखीची आई दिसत आहे. कॅन्सरमुळे राखीच्या आईचे केस गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. राखी सावंतची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. राखीच्या आईवर आता किमोथेरपीचे उपचार सुरू आहेत. याचीच माहिती राखीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.