भाजपा खासदार रक्षा खडसे कोरोना पॉझिटिव्ह

0
45

भाजपा खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस त्या होम क्वारंटाईन असणार आहेत. कोरोनाची लागण झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोशल मीडियावरून दिली. त्याचबरोबर संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. प्रकृती स्थिर असल्याचे सांगत इतरांनी काळजी घ्या अशा सूचनाही केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहेत. नेते मंडळींचा रोज जनसंपर्क होत असल्याने कोरोनाची लागण होताना दिसत आहे.