भाजपमध्ये रामाची एन्ट्री, ‘रामायण’ मालिकेत अरुण गोविल भाजपात सामील

0
31

‘रामायण’ या मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल आज गुरुवारी भाजपमध्ये सामील झाले आहेत. रामानंद सागर यांची मालिका ‘रामायण’ यामध्ये त्यांनी भगवान रामची भूमिका साकारून सर्वांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. अरुण गोविल दिल्लीतील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजपात सामील झाले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अरुण गोविल म्हणाले की ‘यावेळी जे काही आपले कर्तव्य आहे ते केले पाहिजे. आजच्या आधीचे राजकारण मला समजले नाही, परंतु मोदी जेव्हापासून पंतप्रधान बनले तेव्हापासून देशाची व्याख्या बदलली आहे. पुढे अरुण गोविल म्हणाले की, आता मला देशासाठी योगदान द्यावे असे वाटले आणि त्यासाठी आम्हाला व्यासपीठाची आवश्यकता आहे आणि भाजपा हा एक उत्तम व्यासपीठ आहे.