‘हम दो हमारे दो’वरुन आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला

0
27

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेल्या सल्ल्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी प्रचार भाषणे, सोशल मीडियातून केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडत आहेत. केंद्र सरकार हम दो हमारे दो या नितीवर काम करत असल्याचं सांगत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. या घोषणेतून सरकारमधील दोघेजण दोन उद्योगपतींसाठी काम करत असल्याचे ते मांडत आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. ‘यापूर्वीच्या सरकारने कुटुंब नियोजनासाठी या घोषणा दिली होती. ही घोषणा त्यांना पुन्हा लोकांसमोर मांडायची असेल तर त्यांनी लग्न करायला हवं, त्यांनी दलित कुटुंबातील मुलीशी विवाह करावा आणि जात नष्ट करण्याचे महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण करावे. यातून तरुणांना प्रेरणा मिळेल.’