रणबीर कपूरच्या आत्याचा मुलगा ईडीच्या रडारवर

0
32

रणबीर कपूरची आत्या रीमा जैनचा मुलगा अरमान जैनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने त्याला टॉप्स ग्रुपशी संबंधीत मनी लॉन्ड्रींग प्रकरणी समन पाठवलं आहे. शोध एजेंसीने जैनच्या घरी छापाही मारला, जिथे तो आपली पत्नी अनिशा मल्होत्रा, आई रीमा जैन आणि अन्य सदस्यांसोबत राहतो. सूत्रांनुसार, प्रकरणात त्यांचं नाव शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांचा मुलगा विहंगसोबत असलेल्या संबंधांमुळे आलं आहे, ज्यांच्याविरोधात आधीच या प्रकरणात चौकशी सुरु आहे.