टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतना यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी गेल्या दिवसांपासून सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागली आहे. देशप्रेम आणि दानशूरपणामुळे भारतीयांना टाटा समूहाबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे #BharatRatnaForTata हा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला होता. या हॅशटॅगच्या माध्यमातून अनेकांनी रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली होती. या हॅशटॅगवर रतन टाटा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत ट्विट केले आहे. भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती त्यांनी केली आहे.
‘मला भारतरत्न मिळावा यासाठी तुमच्या भावनांचा मी आदर करतो. मात्र ही मोहीम थांबवा अशी मी विनंती करतो. देशाच्या प्रगतीत माझे योगदान कायम राहील आणि मी यासाठी स्वत:ला भाग्यवान समजतो’