रत्नागिरीत केमिकल कंपनींमध्ये स्फोट, तीन कामगारांचा जागीच मृत्यू

0
31

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत अचानक स्फोट झाला असून मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटात आतापर्यंत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसेच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्य करत आहेत.

आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरडा कंपनीत अचानक हा स्फोट झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शंका व्यक्त केली जात आहे. तर 3 जण जखमी झाल्याचे असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत माहिती दिली कि, खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील एका रासायनिक कारखान्यात लागलेल्या आगीसंदर्भात आमदार भास्कर जाधव जी यांच्याशी बोलणे झाले. ते घटनास्थळी आहेत आणि तेथे मदतकार्य सुरू आहे.