हिंसा पसरवल्यास सोशल मीडियावर कारवाई होणार; केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा इशारा

0
29

मोदी सरकारने मायक्रो ब्लॉगिंक साईट ट्विटरवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडियाचा वापर हिंसाचार, फेक न्यूज पसरवण्यास केला तर कारवाई होईल असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत उत्तर देताना सोशल मीडिया कंपन्यांना इशारा दिला आहे. कायद्याच्या चौकटीत राहुनच सोशल मीडिया वापरण्यात यावे. अफवा पसरवण्याची कुणालीही मुभा नाही असंही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन, व्हॉट्सअॅप यांना कायद्याचे पालन करावेच लागेल अन्यथा कारवाईचे संकेत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले आहेत.

ट्विटर प्रकरणी भारताच्या कारवाईचं अमेरिकेने समर्थन केले आहे. भारताने शेतकरी आंदोलनात खोटी माहिती पसरवण्याऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यात खालिस्तान आणि पाकिस्तान संबंधित 1,178 ट्विटर खात्यांचा समावेश आहे. या आदेशानंतर ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये तणाव वाढला आहे.