रयत क्रांती संघटनेकडून शेतात शिवजयंती साजरी

0
34

दौंड तालुक्यातील कानगाव येथे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा सोहळा शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरच साजरा केला. राज्य शासनाने शिवनेरीवर जमावबंदी असल्याने शेतकऱ्यांनी शिवजयंती शेतावरच साजरी करावी असे आदेश रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले होते. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कृषी पंपाचे कनेक्शन तोडून शेतकऱ्यांचे उभे पीक जाळण्याचा घाट राज्य सरकार व वीज वितरण कंपनीने घातलेला आहे. म्हणून शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवरायांसमोर कृषी पंपाच्या वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे व इतर अनेक युवा वर्ग सहभागी झाले होते.