आज मंत्रिमंडाळाच्या बैठकीत झालेले महत्त्वपूर्ण निर्णय वाचा इथे!

0
35

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बरेच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पिंपरी चिंचवड-निगडी कॉरिडॉर उन्नत मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. “राज्यात कौशल्य विद्यापीठ उभारणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यासंबंधितचे विधेयक 2021 विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. सोबतच या बैठकीत पर्यटनासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नाविण्यपूर्ण कॅराव्हॅन पर्यटन धोरणासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.