राज्यपालांना पुन्हा बोलवा; शिवसेनेची केंद्र सरकारला विनंती

0
35

महाराष्ट्रात राज्यपालांचा वापर कठपुतलीसारखा होत असल्याचा आरोप शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आलाय. राज्यपाल पदाचा मान राखला गेला पाहीजे. राज्यपाल विधान परिषदचे 12 सदस्यांची निवड अजूनही प्रलंबित आहे. त्यांच्याकडे सरकारने 6 महिन्यांपूर्वी यादी दिली आहे. मात्र भाजपाच्या दबावामुळे त्यांनी अजूनही 12 सदस्यांना मंजुरी दिलेली नाही. या सदस्यांची नियुक्ती 6 वर्षांसाठी असते. त्यांच्या कार्यकालानुसार हे सदस्य निवृत्ती होतील. मात्र त्यांची नियुक्ती राज्यपालांच्या हातात आहे. हे संविधानाचे उल्लंघन असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. संविधानाचा मान राखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यपालांना परत बोलवावे अशी विनंती शिवसेनेने केली आहे.