‘अमृताताई गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो’ – रोहित पवार

0
43

सोमवारी जागतिक महिलादिनाचे निमित्त साधत ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“अमृताताई संधीचा योग्य वापर करत आहात, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!”, असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.