रितेश देशमुख आणि जेनेलियाने मानले महाराष्ट्र सरकारचे आभार

0
31

अभिनेता रितेश देशमूख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. या संदर्भात दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सोमवारी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतून राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये जनतेच्या हितासाठी अनेक योजना देखील जाहीर करण्यात आल्या, तसेच काही मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. त्यामधील विशेष म्हणजे, ‘ईस्टर्न फ्री वे’ मार्गाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी अजित पवार यांनी केली आहे. काही वर्षापूर्वी मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांच्यामुळे हा मार्ग होऊ शकला, त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे हा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जेनेलिया डिसूझा आणि रितेश यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.