रॉबर्ट वाड्रा यांनी चालवली सायकल ,इंधन दरवाढीचा नोंदवला निषेध! 

0
35

इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी अनेक नेते रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत.यामध्ये आता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा चक्क दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसले. ते आपल्या एसी गाडीला बाजुला ठेवत सायकलवर स्वार होत आपल्या कार्यालयात पोहचण्याचा निर्णय रॉबर्ट वाड्रा यांनी घेतला.दिल्लीतल्या खान मार्केटपासून आपल्या कार्यालयापर्यंत ते सायकल चालवत पोहचले. या दरम्यान त्यांचा स्टाफही त्यांच्यासोबत होता.त्यांच्या या निषेधाच्या वेगळ्या स्टाईलची खुप चर्चा होत आहे.