पेट्रोल-डिझेलवरील सेस कमी करावा, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी

0
38

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनभरारी वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीची झळ मात्र सर्वसामान्य जनतेला सोसावी लागत आहे. काही शहरांमध्ये तर पेट्रोलने शंभरी देखील गाठली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डीझेलचे दर कमी करावे, अशी मागणी केली जात आहे.

केंद्र सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे.  देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत ट्विट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. “पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे;  मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल, ही अपेक्षा!,” असे ट्विट करत रोहित पवार यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. तसेच हे ट्विट रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना टॅग देखील केले आहे.