पुण्यात धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह, मंगल कार्यालयाला नोटीस

0
596

कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचाशाही विवाह सोहळा पार पडला. त्यांचा हा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता. याबाबत मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. यालग्न सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.