संघ प्रमुख भागवत यांनी घेतली मिथुन चक्रवर्तीची भेट

0
37

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. मोहन भागवत त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील निवास्थानी गेले होते. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी त्यांनी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऑक्टोबर 2019मध्ये सुद्धा मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट झाली होती. ही भेट नागपूरमधील संघ कार्यालयात झाली होती. तेव्हा मिथुन चक्रवर्तीने संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांना पुष्पांजली वाहिली होती.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी भाजपा नविन चेहरा शोधत आहे. दुसरीकडे भाजपा प्रवेशाच्या बातमीचं मिथुन चक्रवर्ती यांनी खंडन केले आहे.

मिथुन चक्रवर्तीची तृणमूल काँग्रेसने राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र सतत अनुपस्थित राहत असल्याने त्यांनी 2016 साली आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.