रुबीना दिलैक नवी बिग बॉस

0
108

बिग बॉग 14 व्या सिझनमध्ये रुबीना दिलैक विजेती ठरली आहे. मानचिन्ह आणि 36 लाख रुपये मानधन तिला मिळालं. रुबीना दिलैक हिला विजेती घोषित केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. अंतिम फेरीत रुबीना दिलैक, निक्की तंबोली, अली गोनी, राहुल वैद्य आणि राखी सावंत पोहोचले होते. 3 ऑक्टोबरपासून बिग बॉस 14 व्या सिझनला सुरुवात झाली होती. 140 दिवस ही मालिका चालली. या शोमध्ये सुरुवातील 12 जण सहभागी झाले होते. त्यात रुबीना दिलैक, राहुल वैद्य, अभिनव शुक्ला, जॅस्मीन भसीन, शहजाद देओल, सारा गुरपाल सिंह, जान कुमार सानू, एजाज खान, पवित्रा पुनिया, निक्की तंबोली आणि निशांत मलखानी यांचा सहभाग होता. त्याचबरोबर गौहर खान, सिद्धार्थ शुक्ला आणि हिना खान या मालिकेत सुपर सीनियर्स म्हणून सहभागी झाले होते.