सचिन जोशीला चार दिवसांची ईडी कोठडी

0
29

पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अभिनेता सचिन जोशीला चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन 18 फेब्रुवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत असणार आहे. 22 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई केली. सचिन जोशीने 100 कोटीहून अधिक गुंतवणूक केल्याचे तपासातून समोर आले आहे. दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली.

विजय मल्ल्याचा बंगला घेतल्याने सचिन जोशी चर्चेत आला होता. तर व्यावसायिक पराग संघवीची फसवणूक केल्याने ऑक्टोबर 2020मध्ये अंधेरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.