सिने अभिनेता सचिन जोशीला न्यायालयीन कोठडी

0
31

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 410 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी उद्योगपती आणि सिने अभिनेता सचिन जोशीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन जोशीचा ताबा मिळवण्यासाठी ईडीने न्यायालयात अर्ज केला होता. ओमकार समुहाच्या विविध कंपन्यांतून सचिन जोशीला निधी मिळाला आहे. हा निधी पुण्यातील एक जमीन विकसित करण्यासाठी मिळाला असल्याचा दावा सचिन जोशी याने केला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेशी याचा संबंध नसल्याचा सचिन जोशी याने सांगितले. ओमकार समुहाने त्याचा नावाचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी ईडीची याचिका फेटाळून लावत आरोपी सचिन जोशीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.