सचिन वाझे यांना अखेर अटक; १३ तासांच्या चौकशीनंतर NIAची कारवाई 

0
34

मुंबई:  मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी 13 तास चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये असा सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.