खोटे शपथपत्र सादर केल्याने सलमानच्या अडचणीत वाढ

0
39
source- salman twitter handle
source- salman twitter handle

कालवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड सुपस्टार सलमान खान याच्या विरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टाकडून सलमानकडे बंदुकीचा परवाना मागण्यात आला होता. मात्र सलमानने शपथपत्रात परवाना गहाळ झाल्याचा नमूद केले होते. आता 18 वर्षानंतर सदर शपथपत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 9 फेब्रुवारीला जोधपूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली तेव्हा ही बाब समोर आली आहे.

8 ऑगस्ट 2003 साली चुकीचे शपथपत्र दिल्याची कबुली सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी कोर्टात सांगितले. 1998 साली कालवीट शिकार प्रकरणात सलमानला अटक करण्यात आली होती आणि बंदुकीचा परवाना मागितला होता. त्यावेळी शपथपत्र देत परवाना गहाळ झाल्याचे सांगण्यात आले होते.

एफआयआरची एक कॉपी कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यात सलमानने परवाना नुतनीकरणासाठी दिला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरकारी वकिलाने कोर्टाची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला होता. त्यावर 9 फेब्रुवारीला सुनावणी झाली. त्यावेळी सलमानच्या वकिलाने व्यस्त कामामुळे चूक झाल्याचे स्पष्ट केले. आता यावर 11 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

न्यायालयात खोटे शपथपथ आणि साक्ष दिल्यास 7 वर्षे शिक्षेची तरतूद आहे.