…म्हणून सलमानने मानले चाहत्यांचे आभार

0
33

शस्त्र परवान्याबाबत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या आरोपावरून राजस्थानच्या एका कोर्टाने गुरुवारी सलमान खानला मोठा दिलासा दिला आहे. त्याच्या विरोधात राजस्थान सरकारची याचिका कोर्टाने फेटाळून लावत या आरोपातून मुक्त केले आहे. अशा परिस्थितीत सलमान खानने एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांचे आभार मानले. सलमान खानने चाहत्यांना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले आहे. “माझ्या सर्व चाहत्यांसाठी.. तुमच्या प्रेमासाठी आणि आधारासाठी धन्यवाद. तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. देव तुम्हाला तारो, सर्वांना प्रेम…” असं कॅप्शन एक फोटो शेअर करत सलमाननं दिलं आहे.