सांगलीत सत्ता असूनही भाजपाचा गेम; राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद

0
119

सांगली महानगरपालिकेत भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपाला कात्रजचा घाट दाखवात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गळ्यात महापौर-उपमहापौर पदाची माळ घातला आहे.त्यामुळे सत्ताधारी भाजपाला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे.तर तुलनेने संख्याबळ कमी असताना देखील राष्ट्रवादीने भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करत महापौर पद आपल्या पदरात पाडून घेतल्याने आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेंस राहिलेल्या या निवडणुकीत भाजपची सत्ता अखेर संपुष्टात आणत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महापौर आणि उपमहापौर पद भाजपाकडून हिसकावून घेतले आहे. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान केला आहे.त्यामुळे धीरज सूर्यवंशी भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार होते.त्यांचा पराभव झालेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदी विजय झाले आहेत. भाजपाचे 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत मतदान केला आहे. महापौरपदाच्या निवडणुकी बरोबर भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाचे उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदूम यांना पराभव झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील या ठिकाणी उपमहापौर म्हणून विजयी झाले आहेत.