बहिण साराकडून अर्जुन तेंडुलकरला शुभेच्छा

0
27

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई इंडियन्स संघात निवड झाल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. बहिण सारानेही अर्जुनसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साराने इंस्टा अकाँउटमध्ये अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘हे यश तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझंच आहे. मला तुझा अभिमान वाटतो’

चेन्नईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात मुंबईने अर्जुनला 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतले आहे. मुंबईने त्याला अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि शेवटचे नाव अर्जुनचे होते. मुंबई इंडियन्स एकमेव संघाने त्याच्यासाठी बोली लावली.