आता तालुक्यात दर 3 महिन्यांनी सरपंच सभेचं आयोजन करण्यात येणार

0
38

आता तालुक्यात दर 3 महिन्यांनी सरपंच सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचनाही हसन मुश्रीफ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गावातील रखडलेली कामं जलदगतीनं व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समजतंय.