१ मार्च पासून शाळा बंद? स्थानिक प्रशासनाला शिक्षणमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

0
39

काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. सातारा, लातूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सुद्धा बघायला मिळाले. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.


ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे. तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड दिली आहे.