नाशिकमध्ये 15 मार्चपर्यंत शाळा राहणार बंद

0
38

नाशिक शहरात कडक नियम असून देखील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नाशिक शहर प्रशासनाने शहरातील शाळा येत्या 15 मार्चपर्यंत बंद राहतील असा निर्णय घेतला आहे.

नाशिकमधील नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नाशिक प्रशासनाने हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. नाशिक शहरातील सर्व शाळा येत्या 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच, 14 तारखेनंतर कोरोनाची स्थिती काय असेल त्यावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यामुळे येथे रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही अन्न आणि नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी दिला.