भाजप नेते कपिल पाटील यांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओला आग

0
43

भिवंडी मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अचानक आग लागली. कपिल पाटील आज काही कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते.यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील गाड्या पार्क करून ते पाटीदार भवन हॉल येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. यादरम्यान कपिल पाटील यांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडी रस्त्यावर उभी असताना, गाडीतुन धूर येऊ लागला आणि बघता बघता अचानक गाडीने पेट घेतला.भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले