शाहीद आणि टीमची “पावरी हो रही है”…

0
64

नुकताच एका पाकिस्तानी मुलीचा, “पावरी हो रही है” व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मुलीच्या या व्हिडिओमुळे मीमर्सला चांगलंच आयतं कंटेंट मिळालं आहे. बॉलिवूडमध्येही या व्हिडिओचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. नुकताच शाहीदने एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात सिनेनिर्माता राज अँड डीके पावरी गर्लच्या टोनमध्ये आपल्या सिनेमाच्या चमूची ओळख करून देत आहे. या व्हिडिओत शाहीदही चांगलीच मस्ती करताना दिसून येत आहे. शाहीदच्या टीमचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. शाहीदने पोस्ट केलेल्या या फनी व्हिडिओला अर्ध्या तासाच्या आत दीड लाखाच्या व्हिव्ज मिळाले होते.