राष्ट्रीय रोलर स्केटिंग चैंपियनशिपमध्ये पहिल्याच प्रयत्नात शनयाने पटकावले सुवर्णपदक

0
42

चंदीगडमध्ये 58 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चँपियनशिपची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. ही स्पर्धा 31 मार्च ते 11 एप्रिल 2021 या कालावधीत खेळली गेली असून डीएव्ही स्कूल मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रोलर स्केटिंग ऑफ इंडिया द्वारे खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत 11 वर्ष वयोगटातील आर्टिस्टिक स्केटिंग मध्ये शनया सजनवाला ईने सुवर्ण पदक पटकावले आहे.

रोलर स्केटिंग चँपियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी शनया सजनवाला ईने पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि पहिल्याच प्रयत्नात तिने राष्ट्रीय स्तरावर जिद्दीने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेची तयारी तिने फक्त चार महिन्यात पूर्ण केली.प्रत्येक खेळाडूच्या यशामागे प्रशिक्षकाची मेहनत सुद्धा असते अश्याच प्रकारे शनयाच्या मागे कोच आदेश सिंग सावली प्रमाणे होते.या स्पर्धेत महाराष्ट्र, केरळ, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच पोंडीचेरीतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तिच्या या यशाचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply