विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत ठिणगी

0
39

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकासआघाडीत कुरबूर सुरु झाली आहे. राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवारांच्या विधानानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा गुंता आणखी वाढला आहे. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद कुणाच्या पारड्यात पडणार यावर आता खलबतं सुरु झाली आहेत. विधानसभा अध्यक्षपद खुले असल्याचे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही या पदावर दावा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली होती. तसेच काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र शरद पवारांच्या विधानाने संभ्रम निर्माण झाला आहे.

राजकीय घडामोडींवर भाजपाचे लक्ष असून पुढचे डावपेच कसे असतील यासाठी रणनिती आखली जात आहे.