शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण

0
56

महाराष्ट्र सरकारमधील अनेक नेत्यांना गेल्या काही दिवसांत कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आता शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून आपली तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी ट्विट करत याबाबद माहिती दिली. ट्विटमध्ये ते म्हणाले , ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.