अमरावतीत शिवसेनेचा एमआयएमला पाठिंबा 

0
29

अमरावती: असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला संकट समजणाऱ्या शिवसेनेने चक्क अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीत पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने एमआयएमला थेट तर मायावतींच्या बीएसपीने अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या या नव्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे शिरीष रासने यांनी बाजी मारली. या निवडणुकीत रासने यांना 9 मते मिळाली तर एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना 6 मते मिळाली. त्यामुळे महापालिकेच्या चाव्या भाजपच्या हाती आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने एमआयएमला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याची टीकाही होत आहे