शिवसेनेची गुजराती मतांसाठी मोर्चेबांधणी!

0
40

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुंबईत गुजराती समाजाची मोठी संख्या आहे. मुंबईत गुजराती मतदार हा भाजपा-शिवसेना युतीचा पारंपरिक मतदार म्हणून पाहिले जाते. आतापर्यंत निवडणुकीत हा मतदार युतीला मतदान करत असल्याचे समोर आले आहे. मात्र आता शिवसेना भाजपा युती तुटल्याने या मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेकडून गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहे. मध्यंतरीच्या काळात ‘जलेबी न फाफडो, उद्धव ठाकरे आपडो’ या घोषणेसह शिवसेनेने जिलेबी फाफडाचा बेत आखला होता. तर आता रासगरब्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधत नवीन गुजराती गीत लॉन्च करण्यात आले.

या कार्यक्रमात नगरसेविका राजुला पटेल यांनीही ताल धरला. तर दुसरीकडे शिवसेना गुजराती समाजासाठी किती चांगले काम करते, हे शिवसेना संघटक हेमराज शाह यांनी सांगितले.