मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षपार्ह भाष्य करणाऱ्या भाजपा नेत्याला नेसवली साडी

0
35

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षपार्ह टीका करणं पंढरपुरातील भाजपा माजी जिल्हाध्यक्षाला महागात पडलंय. शिरीष कटेकर असं या भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. उद्धव ठाकरेंबद्दल एकेरी भाषेत टीका केल्यानं शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळं फासत त्यांना साडी नेसवण्यात आली. याप्रकराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येतेय.

  • उद्धव ठाकरेंवर टीका
  • शिवसैनिकांनी भाजपा कार्यकर्त्याच्या तोंडाला फासलं काळं
  • शिवसैनिकांनी हे कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल
  • 17 जणांवर गुन्हा दाखल