नालासोपाऱ्यात गोळीबार; 2 जण जखमी

0
32

नालासोपारा पूर्वेला असलेल्या मोरेगाव येथे अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 2 जण जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून रविवारी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. आरोपींनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचं समजतंय. जखमींना जवळच्या रुग्णलयात दाखल केले असून, पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.