व्हॅलेंटाईन दिनी श्री राम सेना साजरा करणार ‘माता-पिता दिन’

0
32

हिंदूत्ववादी संघटनाचा व्हॅलेन्टाईन डेला कायम विरोध राहिला आहे. आता श्री राम सेनेने व्हॅलेन्टाईन डेला विरोध करत त्यादिवशी माता-पिता पूजा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात कार्यरत असलेल्या या संघटनेने अश्लिल चाळे ज्या ज्या ठिकाणी होतात तिथे हा दिवस साजरा करण्याच निर्णय घेतला आहे. पब्स, बार, मॉल्स, आईसक्रिम पार्लर आणि पार्कमध्ये कार्यकर्ते हा दिन साजरा करतील असं श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुथालिक यांनी सांगितले. मात्र माता-पिता दिन साजरा करताना कायदा हातात घेणार नाही, मात्र पोलिसांनी मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. पश्चिमात्य संस्कृतीमुळे मुलं ड्रग्स, सेक्स आणि लव्ह जिहादसारख्या घटनांना बळी पडत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

दुसरीकडे कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.