‘डोक्याचा वापर करा…हेल्मेट वापरा’, अभिनेता श्रेयस तळपदे याचं आवाहन

0
108

‘हेल्मेट हे केवळ वाहतूक पोलीस दिसल्यावरच घालण्याची गोष्ट नाही, तर आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आहे. हेल्मेट घालून केसं खराब झालेले चालतील पण स्वत:चे आणि आपल्या कुटूंबियांचे आयुष्य उध्द्वस्त करू नका. डोकं शाबूत ठेवण्यासाठी डोक्याचा वापर करा…हेल्मेट वापरा’ असे आवाहन अभिनेता श्रेयस तळपदे यांनी उपस्थितांनी केले. राज्यात सुरू असलेल्या 32व्या राज्य रस्ते सुरक्षा अभियान निमित्ताने शिव वाहतूक सेना आणि युवासेवा फाऊंडेशन यांच्यातर्फे गोरेगाव वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस बांधवांना तसेच दुचाकीस्वार वाहनचालकांना आज मोफत शिरस्त्राणे, परावर्तक जाकीट, रस्ते सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका, प्रथमोपचार पेटी आणि अग्निप्रतिबंधक उपकरण यांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, सिनेअभिनेते श्रेयस तळपदे, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, स.पो.नि.उत्तर परिक्षेत्र कपिले मॅडम, बीसीसीआय लेव्हल२ क्रिकेट प्रशिक्षक निलेश भोसले, प्रभारी वाहतूक निरीक्षक मुकुंद यादव आदी मान्यवर उपस्थित होते.