उत्तराखंडमध्ये कोसळला हिमकडा, मुख्यमंत्री जोशीमठाकडे रवाना; हरिद्वार पर्यंत अलर्ट जारी 

0
68

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा (glacier)कोसळल्याने धावली नदीला महापूर आला. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.आज रविवारी सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली असून जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हा हिमकडा कोसळला. यामुळे या धरणाचा कडाही तुटला असून या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी झालेय यामध्ये अनेक घरे अन माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आलाय.बचावकार्यासाठी बचावकर्मी पोहोचले असून यामुळे रिशिगंगा प्रोजेक्टला सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी- 1070 अन 9557444486 जारी केला आहे. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन. 9557444486 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) झालेल्या नैसर्गिक प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले असून अनेकजण बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री रावत यांच्याशी फोनवरून चर्चा केलीय.दिल्लीहून एनडीआरएफची(NDRF) एक टीम उत्तराखंडला पाठवली. ही टीम उत्तराखंडमध्ये पोहोचली असल्याचं सांगण्यात येत असून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार आहे. या दुर्घटनेत 9 ते 10 नागरिकांचे मृतदेह आढळले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा तसेच मदतीचं आश्वासन दिल

  • उत्तराखंडमध्ये घडली दुर्देवी घटना
  • जोशीमठात कोसळला मोठा हिमकडा
  • यामुळे धावली नदीला महापूर
  • हरिद्वार पर्यत अलर्ट जारी
  • सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी